Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीची सुनावणी पुढे ढकलली

ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीची सुनावणी पुढे ढकलली

मुंबई : ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय.

आज राज्यसरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच, कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार पगारवाढ दिल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

आजच हा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. त्यामुळे हा अहवाल वाचनासाठी वेळ मिळावा यासाठी न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी घेण्याचा निर्णय दिला. 

Read More