सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त करण्यासंबंधी अर्जावर ही सुनावणी असणार आहे. आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स मिळण्याबाबत, तसेच चार्ज फ्रेम करण्याबाबत सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांकडून यावर युक्तिवाद झाला. याबाबत न्यायालयाकडून आज निर्णय येण्याची शक्यता आहे. सरकारी वकील उज्वल निकम देखील उपस्थित राहण्याची शक्यताय त्यामुळे वाल्मिक कराडचं काय होणार या निर्णयाकडे राज्याचे लक्ष असेल.