Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी

जोरदार पावसाने अनेक भागात साचलं पाणी

शहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी

शहापूर : शहापुर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासापासून येथे मुसळधार पाऊस होतो आहे. शहापूर बाजारपेठ, आसनगाव स्टेशन परिसर, वासिंद रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे. शहापूर शहारातील छोटे नाले भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भातसा धरणातून वाहनारी भातसा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सापगाव जवळील अनेक गावांना जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता  निर्माण झाली आहे.

गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे.

Read More