Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Rain Update : ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस

येत्या 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Rain Update : ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. रायगडमध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय.

महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत काही भागात पाणी साचले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यानंतर आज पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

हवामान खात्याने पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

Read More