Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोकणात येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह कोकणात उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय.

कोकणात येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईसह कोकणात उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. नवीन अंदाजानुसार मुंबईसह संपूर्ण कोकणसाठी उद्या आणि परवाचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. मान्सून दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर दाखल झाला असून तो कोकणात येत्या २४ तासांत येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  यापूर्वी हवामान खात्यानं १० आणि ११ जूनला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र या दोन्ही दिवशी उद्या आणि परवाच्या तुलनेत कमी पाऊस असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलायं. 

Read More