Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आजपासून दोन दिवस मुसळधार, IMD ने जारी केला अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Today Weather Update: हवामान खात्याने पुढील दोन दिवस पाऊस आणि थंड वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मान्सूनबाबत अपडेट देखील देण्यात आला आहे.  

आजपासून दोन दिवस मुसळधार, IMD ने जारी केला अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

IMD Weather Update of 22 june 2025: आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवातच थंडगार होणार आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तर भारतात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा आणि गारवा निर्माण करणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे दिल्ली-एनसीआरसह अनेक भागांत हवामान अधिकच आनंददायी होणार आहे.

मान्सून वेळेआधी दिल्लीत!

यंदा मान्सून आपली नेहमीची वेळ टाळून आठवडाभर आधीच दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी 29 जूनला मान्सून दिल्लीमध्ये प्रवेश करतो, पण यंदा तो 24 किंवा 25 जूनलाच पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याकडून ‘गुड न्यूज’

शनिवारी आकाशात ढगांची लपाछपी सुरू होती. उन्हाचा प्रभाव कमी असला तरी दमट हवेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. मात्र रविवारी आणि सोमवारसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सध्या थंड आणि आल्हाददायक हवामानात आणखी गारवा जाणवणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार, विदर्भात अजून प्रतीक्षा

कोल्हापूर, नागपूर, अकोला इथे  गेले महिनाभर राज्यात मान्सून पावसाचा जोर वाढला असून जवळ जवळ 95 टक्के महाराष्ट्र पाणीदार झाला आहे. धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. विदर्भाला मात्र यंदाच्या पावसाने अद्याप हुलकावणी दिली आहे. धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली आहे. कोणत्याही क्षणी पाणी पात्राबाहेर पडू शकते, अशी स्थिती आहे. वेल्हाळ नागपूरसह संपूर्ण विदर्भातील शेत शिवारं पेरणीसाठी तयार आहे, वखरणीची कामे पूर्ण झाली असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

निम्मा जून संपला तरी तापमान कमी होईना

निम्मा जून महिना संपला तरी विदर्भातील तापमान कमी होईना. शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये कमाल तापमान 37.8 अंश होते. आता 24 पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Read More