Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

Rain in Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.  (Heavy rains in Maharashtra for next three days)

राज्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी चांगले ऊन पडलेले दिसून येत आहे. उद्या रविवारपासून पुन्हा चांगला ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आकाश स्वच्छ दिसत आहे.

Read More