Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गडचिरोली : यशोगाथा एका वीरपत्नीची

2009 साली गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस शिपाई जुरू परसा यांना वीरमरण आले.  जुरू परसांच्या हौतात्म्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्या पत्नी हेमलता परसांवर आली. 

 गडचिरोली : यशोगाथा एका वीरपत्नीची

आशिष अम्बाडे,  झी मीडिया ,गडचिरोली  : 2009 साली गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस शिपाई जुरू परसा यांना वीरमरण आले.  जुरू परसांच्या हौतात्म्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्या पत्नी हेमलता परसांवर आली. 

एमएएमएड असलेल्या  हेमलता लग्नाआधी एका शाळेत शिक्षिका होत्या. लग्नानंतर नोकरी सोडली.... पण पती जुरू परसा यांच्या हौतात्म्यानंतर हेमलताला कुटुंब सावरायचं होतं..... डोळ्यातले अश्रू निग्रहाने पुसत त्या उभ्या राहिल्या.... २०१५ साली त्यांना अनुकंपा तत्वावर  शिक्षणाधिकारी म्हणून शासकीय नोकरीत घेण्यात आलं. पण अटीनुसार २ वर्षात आवश्यक एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक होतं. हेमलता यांनी या संधीचं सोनं केलं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्या उत्तम गुणांसह एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 

हेमलता यांच्या या यशानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते हेमलता यांचा सत्कार करण्यात आला. 

लग्न झाल्यावर अवघ्या सहा महिन्यांतच हेमलता यांचे पती शहीद झाले.... एवढं डोंगराएवढं दुःख बाजूला सारत त्या मोठ्या हिमतीनं उभ्या राहिल्या.... सलाम त्यांच्या जिद्दीला..... 

Read More