Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात

उपराजधानी सह संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात झाली आहे.

संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात

नागपूर : एप्रिल महिना संपत आला असताना उपराजधानी सह संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात झाली आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४४.३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. आज सकाळी ढगाळ वातावरण होते मात्र उकाड्यात काही कमतरता आली नाही. चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश सेल्सियस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आली. त्याखालोखाल अकोला व वर्धा शहराचे तापमान ४५ अंशावर राहिले. येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Read More