ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : हिंदीबाबतचा शासननिर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. दरम्यान या विजयी मेळाव्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. विजयी मेळाव्यात इतरही पक्षांना विचारात घेतलं पाहिजे असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट
पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून राज्यात हिंदीविरोधात विरोधकांनी चांगलंच रान पेटवलं होतं. पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी राज्य सरकारला दिला होता. शरद पवारांकडून देखील हिंदीला विरोध करण्यात आला होता. चहू बाजूंनी हिंदीला होत असलेल्या विरोधामुळे राज्य सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषेचे दोन्ही जीआर रद्द केलेत. दरम्यान यानंतर ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकत्रित विजयी मेळाव्याची घोषणा केली. मात्र, या विजयी मेळाव्यावरून आता मविआत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विजयी मेळाव्याचं अजूनही अनेक राजकीय पक्षांना निमंत्रण नसल्याची चर्चा होती. मात्र, ठिकाण आताच ठरलं त्यामुळे उशीर झाल्याचं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं जाणार असल्याचं स्पष्टीकरण मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलं आहे.
Sangali | सांगलीत अवतरली तडकडताई,भुताची आई...#sangali #viralvideo #Zee24Taas pic.twitter.com/nkeAc9MSwo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 1, 2025
राज्य सरकारनं हिंदी भाषेचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू जवळपास दोन दशकानंतर एकाच फ्रेम दिसणार आहेत. 5 जुलैला वरळी डोममध्ये हा विजयी मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून मराठी माणसांना आणि सर्वच राजकीय पक्षाला या मेळाव्यात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे या मेळाव्यावरून श्रेयवादाची लढाई देखील सुरू झाली आहे. त्यामुळे या मेळाव्याला कोणकोणत्या पक्षांचे नेते हजेरी लावणार याकडे आता लक्ष लागलं आहे.