Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Hingoli Crime: 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथे पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली:  हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

एका सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. याप्रकरणी या अल्पवयीन आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेl पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मुलाने 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच लगेच पोलीस स्थानकात धाव घेण्यात आली. यानंतर रात्रीच आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली.

स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार 

दुसरीकडे नांदेडच्या एका घटनेत प्रेमविवाहाचा हट्ट करणाऱ्या स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार करून पित्याने तिची हत्या केली. त्यांनतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिचा अंत्यविधीही करून टाकला. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील ही घटना पोलिसानी शिताफीने उघडकीस आणली. मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली होती. 

मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते. मृत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. पण मुलीने त्याच मुलाशी लग्नाचा अट्टाहास केला. तेंव्हा रागाच्या भरात अण्णाराव राठोड याने मुलीवर कोयत्याने वार केले. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला. 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यसंस्कार उरकून टाकण्यात आला. 

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर सखोल तपास करून खुनाचा उलगडा केला. मुक्रमाबाद पोलिसानी आरोपी अण्णाराव राठोड याला अटक केली आहे. यावेळी त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Read More