Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

RBI च्या कॅलेंडरमधून का गायब मोहरमची सुट्टी? बँक, शेअर बाजार उघडणार की बंद राहणार? जाणून घ्या!

Holiday on Muharram 2025: मोहरमच्या दिवशी भारतातील अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी आहे. सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद राहतात. 

RBI च्या कॅलेंडरमधून का गायब मोहरमची सुट्टी? बँक, शेअर बाजार उघडणार की बंद राहणार? जाणून घ्या!

Holiday on Muharram 2025: मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे आणि तो इस्लामिक नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. भारतात मोहरमची तारीख चंद्र दिसण्यावर ठरते. त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या मोहरमच्या तारखेत बदल पाहायला मिळतो. या वर्षी भारतात मोहरमची तारीख ६ जुलै आहे. पण चंद्र एक दिवस उशीरा दिसला तर ती तारीख 7 जुलै (रविवार) होऊ शकते. यामुळेच देशातील विविध राज्यांमध्ये मोहरमची सुट्टी वेगवगेळी असू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या नोटीसकडे लक्ष द्यावे. 

मोहरमच्या दिवशी भारतातील अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी आहे. सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद राहतात. कार्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतात. बँका देखील बंद असतात पण यावेळी आरबीआयने मोहरमसाठी बँक सुट्टी जाहीर केलेली नाही. जर तुम्ही 2023 आणि 2024 च्या आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर दोन्ही वर्षांत मोहरम निमित्त सुट्टी होती. यावेळी ही सुट्टी कॅलेंडरमधून गायब आहे.

6 जुलै रोजी मोहरम, बँक सुट्टी असो वा नसो

या वर्षी 6 जुलै रोजी बँक सुट्टी असणार आहे. देशभरात मोहरमचा सण 6 जुलै रोजी साजरा केला जाईल. मोहरमनिमित्त सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद राहतात. 2024 मध्ये आरबीआयने १७ जुलै रोजी मोहरम/आशुराची सुट्टी दिली होती. त्याआधी 2023 मध्येही आरबीआयने 29 जुलै रोजी मोहरमनिमित्त बँका बंद ठेवल्या होत्या. या वर्षी मोहरम 6 जुलै रोजी आहे. असे असले तरी त्याची सुट्टी आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये नाही. तसेच 7 जुलै रोजी बँका बंद ठेवण्याचा आदेश नाही.

6 जुलै रोजी बँका बंद 

fallbacks

6 जुलै रोजी आरबीआयने मोहरमसाठी सुट्टी दिली नसली तरी, त्या दिवशी बँका बंद राहतील. 6 जुलै 2025 रोजी रविवार ही साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये सुट्टी असेल. ही सुट्टी मोहरमसाठी नाही, तर साप्ताहिक सुट्टी आहे. जुलैमध्ये बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि चार रविवारच्या साप्ताहिक सुट्टीशिवाय एकूण 13 दिवस बंद राहतील. 3 जुलै रोजी करची पूजा आणि 5 जुलै रोजी गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

मोहरम रोजी शेअर बाजार बंद राहील का?

मोहरम रोजी शेअर बाजाराला सुट्टी नाही. पण रविवार असल्याने शेअर बाजार नेहमीप्रमाणे बंद राहील. जुलैमध्ये शेअर बाजाराला सुट्टी नाही. आता 15 ऑगस्ट रोजी शेअर बाजाराला थेट सुट्टी असणार आहे. शेअर बाजार दर शनिवार आणि रविवारी बंद राहतो, जो यावेळीही बंद राहील.

Read More