Latur Accident : लातूरमध्ये भयानक अपघात झाला आहे. ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यत कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे.
लातूर-चाकूर मार्गावरील नांदगावपाटीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस अहमदपूरवरून लातूरकडे येत होती. नांदगावपाटीजवळ अचानक बाईक बससमोर आली. बाईक चालकाला वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटलीय. टर्न घेत असताना हा अपघात झाला. बाईक स्वाराला वाचवताना एसटी बसच्या चालकाने भारधाव बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचे नियंत्रण सुटले आणि टर्निंगवर बस उलटी झाली. बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धुळ्यात स्कूल व्हॅनचा अपघात झाला. हिंगणी गावाजवळ मागून येणा-या आयशेर गाडीने व्हॅनला धडक दिली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येतेय. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय
राज्यात नऊ वर्षांत रस्ते अपघातांमध्ये 1 लाख 22 हजार जणांनी आपले प्राण गमावलेत. तर दोन लाख 58 हजार जण जखमी झालेत. अपघातांमध्ये मुंबई, तर मृतांमध्ये पुणे अव्वल आहे. तर सोलापूर शहरात कमी अपघात झालेत.