Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Beed : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अत्यंत भयानक पुरावा! मारहाण करताना पाईप फुटला, त्याचे 15 तुकडे झाले आणि...

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मीक कराडनं आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजरला खंडणीसाठी फोन केला होता. CIDनं दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे. 

Beed : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अत्यंत भयानक पुरावा! मारहाण करताना पाईप फुटला, त्याचे 15 तुकडे झाले आणि...

Santosh Deshmukh Murder Case :  बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. देशमुखांच्या हत्येप्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूर आणि निघृणपणे केली आहे याचा अत्यंत भयानक पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुख यांना ज्या पाईपने मारहाण केली त्या पाईपचे तब्बल 15 तुकडे झाले. पाईपचे हे सर्व तुकडे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हा तपासातील अत्यंत महत्वाच पुरावा ठरणार आहे.   

संतोष देशमुख यांना आरोपींनी किती क्रूरपणे जीवे मारलं याची विदारक दृश्य दाखवणारे काही फोटो व्हायरल झाले आहेत. सीआयडीनं दाखल केलेल्या 1500 पानांच्या आरोपपत्रासोबत फोटो आणि व्हिडिओचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. यातच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अत्यंत भयानक पुरावा पुरावा समोर आला आहे.  संतोष देशमुखांना मारहाण करून फुटलेल्या पाईपचे 15 तुकडे हस्तगत करण्यात आले आहेत.  सीआयडीने जप्त केलेल्या पाईपचे 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.  देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा पुरावा पाहून अंगावर काटा येत आहे. देशमुख यांना इतकी बेदम मारहाण करण्यात आली की पाईपचे तुकडे झाले आहेत.  

9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे MH44 Z 9333 काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ कारमधून अपहरण करून हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणात ही कार महत्त्वाची ठरली. कारण तपास यंत्रणेला तीन मोबाईल फोनसह एकूण 19 पुरावे याच कारमध्ये सापडले आहेत. 

सरपंच संतोष देशमुख यांना लोखंडी पाईपला करदोडा बांधून मारहाण झाली. ते हत्यार देखील याच कारमध्ये आढळून आले. देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर ही कार मांजरसुंबा - अंबाजोगाई महामार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एवढेच नाही तर सहा आरसी बुक, सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड अशा बऱ्याच वस्तू यात आढळून आल्या आहेत.  ही कार आरोपी सुदर्शन घुलेच्या नावावर रजिस्टर आहे. 

 

Read More