Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र हे नाव कसं पडलं आणि कोणी दिलं?

Maharashtra Day 2024 : व्यक्ती असो वा एखादा प्रदेश किंवा राज्य हा त्याचा नावाने ओळखला जातो. राज्यांना मिळालेल्या नावामागे इतिहास असतो. अशात आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणी दिलं. 

Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र हे नाव कसं पडलं आणि कोणी दिलं?

Maharashtra Day 2024 : येत्या 1 मे 2024 ला राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. एखाद्याला राज्याला किंवा शहराला त्यांच्या नावाने ओखळलं जातं. या शहर, गाव आणि राज्यांना त्या राज्यातील किल्ले, धार्मिक महात्म्य आणि संतांची भूमीमुळेदेखील ओळखलं जातं. नागपूर हे संत्राचं शहर तर नाशिक हे द्राक्षाचं शहर म्हणून ओखळलं जातं. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? की आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं मिळालं? महाराष्ट्राला त्याचं नाव मिळाल्यामागे इतिहास असून त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

साडेतीन हजार वर्षांची परंपरा!

महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले असता तीन हजार वर्षांपूर्वीच्या अगस्त्य ऋषींपासून वेद आणि जुने पुरावे पाहिल्यास त्यातून काही संदर्भ मिळतात. शकांच्या आक्रमण्यापूर्वी तिसऱ्या शतकात साधारणपणे आर्यांचं या प्रदेशात येणं जाणं होतं असे पुरावे समोर आलेत. 

महाराष्ट्र नाव कसं पडलं?

महाराष्ट्र हे नाव कसं पडलं याबद्दल ठोस असे काही पुरावे मिळत नाहीत. मात्र पूर्वापार अशी समजूत आहे की, रहट्ट या शब्दावरुन महाराष्ट्र या नावाचा जन्म झाला. शिवाय आजच्या बोलण्यातून किंवा लिखाण्यातून आपण मराठा आणि मराठी हे शब्द वापरतो. पण प्राचीन साहित्याचे पानी चाळली की असं दिसून आलं की, ज्ञानेश्वरी किंवा कोणताही महानुभाव साहित्यामध्ये हा उल्लेख हा 'मऱ्हाट किंवा मरहट्ट' असा करण्यात आलाय. 'मऱ्हाट किंवा मरहट्ट'  प्राचीन शब्द असून यातून महाराष्ट्र हे नाव उदयास आले.

हे संदर्भ देतात महाराष्ट्र नावाच्या इतिहासाची गाथा!

जुन्या वेद पुराणात महाराष्ट्राचा उल्लेख 'दंडकारण्य' म्हणून केल्या गेल्याच पाहिला मिळालं. तर बौद्ध धर्माच्या ग्रंथात महाराष्ट्र या उल्लेख पाहिला मिळतो. तर ऋग्वेदात महाराष्ट्राला 'राष्ट्र' या असं म्हटल्या गेलं आहे. सम्राट अशोकाच्या काळात ''राष्ट्रिक' आणि नंतर महाराष्ट्र या नावाने हे राज्य ओळखलं गेल्याचे काही पुरावे मिळतात. 

तर या राज्यात 'महार' आणि 'राष्ट्र' या लोकांची वस्ती असल्याने त्याला महाराष्ट्र असं म्हटल्याचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये करण्यात आलाय. काहींच्या मते हे नाव 'महाकांताकार' म्हणजेच 'वने दंडकारण्य'या शब्दाचा अपभ्रंश असल्याच म्हटलं गेलंय. महानुभाव पंथाचे थोर संत चक्रधर स्वामींनी 'महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या करण्यात आली आहे. या ठिकाणी छोटे छोटे गोत्र राहत होते ती गोत्रे 'रट्ट म्हणजेच मरहट्ट' होती. ही लोक आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य गाजवू लागले आणि अशीच छोटी छोटी राज्य मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली. तर काहींच्या मते, महाराष्ट्र नावाचे उद्भव संस्कृत शब्द 'महाराष्ट्र' आहे, ज्याचा अर्थ होतो 'महान राज्य' किंवा 'महत्त्वपूर्ण राज्य' असा करण्यात आलाय. हे नाव मुख्यतः इ.स. 325 च्या काळातील अशोक यांच्या प्राचीन अशोकावती इ.स. 264 साली केल्याचा पाहिला मिळतो. या नावाचा वापर प्राचीन काळात महाराष्ट्र क्षेत्राच्या विविध राज्यांच्या संघटनेसाठी केला गेला होता असं म्हटलं जातं. 

महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

सातवाहनाच्या 30 राजानी इ.स.पू. 230 ते इ.स. 230 असे एकूण 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केल्याचं अनेक ग्रंथ आणि इतिहासकार सांगतात. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शविणारे आणि महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिलं महाराष्ट्रातील राजघराणे होते असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. 

Read More