Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

HSC Exam 2023 : 12वीचा फुटलेला गणिताचा पेपर 'झी 24 तास'च्या हाती, बोर्डाच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

HSC Exam Paper Leak: आज बारावीचा गणितचा पेपर होता. मात्र या पेपरच्या मोठी बातमी समोर आली.  बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद  गोसावी यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 HSC Exam 2023 : 12वीचा फुटलेला गणिताचा पेपर 'झी 24 तास'च्या हाती, बोर्डाच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

HSC Exam 2023 Paper Leak: राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे. मात्र यंदाच्या बारावी परीक्षेसंदर्भा अनेक बातम्या समोर येत आहे. सुरूवातीला बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाच्या ऐवजी उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते.  तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) गुन्हा दाखल करण्यात आला. असे असतानाही बुलडाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज परिक्षेआधीच गणिताचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा पेपर कसा फुटला असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.   

वाचा: 'झी 24 तास'च्या बातमीचे विधानसभेत पडसाद! अजित पवारांनी दाखवली क्लिप

आज (3 मार्च) बारावीचा गणिताचा पेपर होता. सिंदखेडराजा इथं एका परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर सकाळी 10.30 नंतर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्यास सुरूवात झाली. परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला, याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.

12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी झी 24 तास ला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

बोर्डाचे अध्यक्षांची प्रतिक्रिया... 

झी 24 तासला प्रतिक्रिया देताना शरद गोसावी म्हणाले, या प्रकरणी विद्यार्थी स्वत: दोषी असेल किंवा परिक्षा प्रक्रियेतील एखादा गट दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. पण यामुळे विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही. कारण विद्यार्थी सकाळी 10.30 वाजता वर्गात गेले होते. त्यानंतर 12.30 वाजता पेपर फुटीची माहिती मिळाली ती पण झी 24 तास कडूनचं समजली. त्याआधी पेपर किती वाजता व्हायरल झाला? का झाला? कुठून झाला? याची चौकोशी केली जाणार त्यानंतर दोषींवर कारवाई नक्कीच केली जाईल,अशी प्रतिक्रिया बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी झी 24 तास दिली आहे.  

Read More