Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बारावीचा पेपर बाहेर आला, पुन्हा परीक्षा घेणार नाही - काळे

बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलंय. 

बारावीचा पेपर बाहेर आला, पुन्हा परीक्षा घेणार नाही - काळे

पुणे : बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलंय. 

पेपर फुटला नाही, हा गैरप्रकार

दरम्यान, पेपर सुरू झाल्याच्या दीड तासांनंतर हे फोटो बाहेर आल्यानं याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल असंही त्यांनी सांगितले.

बारावीचा पेपर व्हाटस्अॅपवर

सोलापूर जिलह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला होता. इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे फोटो तासाभरातच व्हायर झाले होते. त्यानंतर बोर्डाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Read More