Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Navi Mumbai International Airport​ News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. 

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

मुंबई : Navi Mumbai International Airport News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत याबाबात निर्णय  घेण्यात आला आहे. स्वतः मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दि. बा. पाटील यांच्या नावाला होकार दिला आहे. त्यांनी माझा विरोध कधीच नव्हता, असे यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव पुढे आला होता. त्यामुळे यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र, आज प्रकल्पग्रस्त आणि आग्री, कोळी, कुणबी आदी समाजातील नेत्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे मान्य केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या नावाला माझा विरोध नाही, असे स्पष्ट केले. 

दि. बा. पाटील यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर दिली माहिती. जे नाव दिले ते एकनाथने दिले माझा त्याला विरोध नाही. रायगड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Read More