Igatpuri Crime: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे पोलिसांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये जमाव पोलिसांचे कपडे फाडताना दिसतोय. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी इगतपुरी पोलीस स्थानकाचे कर्मचारी गेले होते. पोलीस कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडण्यात आले.
पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाल्याचे सांगण्यात येतंय. 4 दिवसापूर्वी आत्महत्येची घटना घडली होती. किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जमावाकडून करण्यात आलाय.
नाशकात सिगारेटच्या वादातून अवघ्या एका रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झालाय. नाशिकच्या अंबड परिसरात एका पानटपरीत ही घटना घडली. बुधवारी दुपारी विशाल भालेराव सिगारेट घ्यायला गेले. मात्र 10 रुपयांची सिगारेट 11 रुपयांना का विकता? यावरुन भालेराव यांचा टपरीचालक बापू जगन्नाथ सोनावणेसोबत वाद सुरु झाला. चिडलेल्या सोनवणेनं भालेरावच्या डोक्यात लाकडी दांडा मारला. यात भालेराव जखमी झाले. त्यांच्या साथिदारांनी त्यांना रुग्णालयात नेलं. उपचार करुन ते घरी आले.. मात्र विशाल भालेराव यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी टपरीचालक बापू आणि किरण सोनवणे या बापलेकांना अटक केलीय.विशाल भालेराव हे एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होते. त्यांच्या पगारावरच संपूर्ण कुटुंबाचा गाडा चालत होता. मात्र त्यांची अशी हत्या झाल्यानंतर कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. नाशकात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना वाढताहेत. काही दिवसांपूर्वी उपनगर परिसरात सख्ख्या भावांची वर्चस्ववादातून हत्या झाली होती. तर आता अंबड परिसरात एक रुपयाच्या किरकोळ वादातून खून झालाय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाय का असा सवाल उपस्थित केलाज जातोय.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याचा प्रकार समोर आलायं. ज्या कक्षात हे शॉर्ट सर्किट झालं तिथे 69 नवजात बालक होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले.