Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Weather Update | राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट तर 9 ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update | राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. 

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.  

या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे. 

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होऊ शकतं. 

या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट

अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Read More