Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Diwali 2021 : बारामतीत पवार कुटुंबाचं भाऊबीज सेलिब्रेशन

खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं औक्षण   

 Diwali 2021 : बारामतीत पवार कुटुंबाचं भाऊबीज सेलिब्रेशन

जावेद मुलानी, झी मीडीया, बारामती :  बारामतीत आज भाऊबीज निमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे औक्षण त्यांच्या बहिणींकडून करण्यात आले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची बहिण खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य बहिणींनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी सण एकत्र सेलिब्रेट करताना दिसले.

भाऊबीजेच्या सणानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडलाय. 

fallbacks

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले भाऊ अजित पवार, आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांचे औक्षण केले. कालचा पाडवा देखील पवार कुटुंबीयांनी अत्यंत उत्साहात साजरा केला होता. दिवाळी पाडव्याची काही क्षणचित्रे,  व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट केली होती.   

fallbacks

मागच्या वर्षी कोरोनामुळे उत्साह कमी होता कार्यकर्ता भेट सोहळा देखील मागच्या वर्षी नव्हता. यंदा पवार कुटूंबात दिवाळीचा सण एकत्रित येत मोठ्या उत्साहात आनंदात  साजरा झाला आहे. 

 

 

 

Read More