Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन; बॅगेत सापडला होता मृतदेह

भाईंदर येथे पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते ट्रॅव्हल बॅगेत भरले. पत्नीचे मुंडके त्याने समुद्रात फेकले. पोलिस समुद्रात मुंडके शोधत आहेत. 

पत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन; बॅगेत सापडला होता मृतदेह

Bhayandar Crime News : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन किना-यावर बॅगेत महिलेचा मुंडके नसलेले मृतदेह आढळला होता. सकाळी किना-यावर स्थानिक नागरिकांना ही बॅग निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यानंतर आता पत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन सुरु आहे (Bhayandar Crime News). 

मृतदेहाचे तुकडे करुन ट्रॅव्हल बॅगेत भरले

2 जून रोजी भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावर एका ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा मृतदेह कापून फेकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला असून चरित्र्याच्या संशयावरून तिच्याच पतीने तिची हत्या केल्याचे उघड झाले. उत्तन सागरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती सह त्याच्या भावाला अटक केली आहे.अंजली सिंग असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून मिंटू सिंग असं आरोपी पतीचे नाव आहे.

हत्या करुन मुंडके समुद्रात फेकले 

या हत्या प्रकरमात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. उत्तन सागरी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केल्यानंतर त्याने 
पत्नीचे कापलेले मुंडके समुद्रात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर  पोलिसांनी समुद्रात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. स्पीड बोटीच्या साहाय्याने आणि स्विमर्सच्या मदतीने पोलीस समुद्रात शोधकार्य करत आहेत.चारित्रच्या संशयावरून आरोपी पतीने पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

हातावरील टॅटूमुळे हत्येचा उलगडा

या महिलेचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत होता. यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मृत महिलेच्या हातावर असलेल्या टॅटूच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवली. ओळख पटवल्यानंतर पोलिस तिच्या घरापर्यंत पोहोचले. उत्तन सागरी पोलिसांनी  याप्रकरणी आरोपी पती व या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीच्या भावाला अटक केली. अंजली सिंग असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मिंटू सिंग असं अटक आरोपीचे नाव आहे. मिंटू सिंग याने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली. मिंटू सिंग याने कट रचून पत्नीला संपवले आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंडके वेगळे कापून शिराचे तुकडे केले.  त्यानंतर एका ट्रॅव्हल बॅगमध्ये हे मृतदेहाचे तुकडे भरले होते. आपल्या भावाच्या मदतीने आरोपीने पत्नीचा मृतदेह असलेली बॅग समुद्रात फेकून दिल्याचे तपासात पोलिसांना सांगितले.

Read More