Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : ...म्हणून होणाऱ्या बायकोच्या घरात घुसून तिची हत्या केली; एका महिन्यावर होते लग्न

अवघ्या काही तासाच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तपासात आरोपीने हत्येची कबुली दिली आहे (Crime News ). आरोपीचा कबुली जबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत. एका महिन्यावरच यांचे लग्न होते. 

Crime News : ...म्हणून होणाऱ्या बायकोच्या घरात घुसून तिची हत्या केली; एका महिन्यावर होते लग्न

Crime News : लग्नाआधीच भावी वधूचा माथेफिरू भावी वरानं गळा चिरून केला खून केल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यातल्या घडली होती. हत्या करुन फरार झालेल्या या माथेफिरु तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपसादरम्यान अत्यंत धक्कादायक कारण उघडकीस आले (Jalna crime).  

मंठा तालुक्यातील बेलोरा गावात ही घटना घडली. येथील एका 18 वर्षीय तरुणाचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत लग्न ठरले होते. 17 मार्च 2023 रोजी यांचा विवाह होणार होता. यापूर्वीच होण्याऱ्या पतीने या तरुणीची हत्या केली आहे. 

वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी जालना येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते. यावेळी वर असलेला तरुणही बस्ता बांधण्यासाठी सोबत आलेला होता. मात्र अचानक तो गायब झाला. या गायब झालेल्या तरुणाने थेट वधूचे गाव गाठले. घरी फक्त भावी वधू एकटीच होती. ती एकटीच असल्याची संधी साधत भावी वरानं तिचा गळा चिरला. 

या घटनेत तरुणीचा जागीच तिचा मृत्यू झाला. गावातील लोक जमा होताच खून करून आरोपी पसार झाला.  घटनेचे वृत्त समजताच सेवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपी वराला बेड्या ठोकल्या.  यानंतर आरोपीने पोलिसांना धक्कादायक कबुली दिली आहे.

आरोपीने होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केला होता. त्याने पुन्हा बलात्कार करण्याता प्रयत्न केला असताना तरुणीने विरोध केला. तसेच घरच्यांना याबाबत सांगेत असे सांगितले. यामुळे चिडलेल्या वराने थेट तिचा खून केला.  या प्रकरणी वरासह त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. लग्नासाठी दोन हुंडा घेतल्याची तक्रार मुलीच्या कुंटुंबियांनी केली. त्यानुसार कुटुंबियांवर कारवाई करण्यात आलेय. 

Read More