Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुळशी पॅटर्न स्टेटस पडला महागात, भाईगिरी करणाऱ्या पोरांना धाडलं तुरुंगात

काही जण सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतात तर काही जण याचा गैरवापरही करताना दिसतात

मुळशी पॅटर्न स्टेटस पडला महागात, भाईगिरी करणाऱ्या पोरांना धाडलं तुरुंगात

रविंद्र कांबळे, झी मीडिया, कोल्हापूर : आजची तरुणपिढी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. खासकरुन विविध वेबसाईटसह व्हॉट्स अॅपवरही युवा पिढी दिवसाचे 12 तास अॅक्टिव्ह असतात. काही जण सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतात तर काही जण याचा गैरवापरही करताना दिसतात. आजकाल तर सोशल मीडियाचा वापर दहशत पसरवण्यासाठी करण्याचं फॅडच आलं आहे. अशाच काही व्हॉट्सअॅप हिरोंना कोल्हापूर पोलिसांनी हिसका दाखवलाय. 

कोल्हापुरातल्या इचलकरंजीतल्या कबनूर गावातल्या काही तरुणांनी मुळशी पॅटर्न स्टाईल मारत व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवला. हातात बंदुक घेत डायलॉग असलेल्या या स्टेटला लाईक पण भरपूर आले. पण हेच बंदूकवालं स्टेट्स कोल्हापूर पोलिसांच्या बघण्यात आलं आणि मुलांना थेट तुरुगांची हवा खावी लागली. 

व्हॉट्सअॅप, टीकटॉक, इन्स्टाग्राम आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक भागात तलवारी, कोयते, बंदूक हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पण तरुणांनो लक्षात ठेवा, पोलिसांची तुमच्यावर नजर आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधल्या एका तरुणाला अशीच स्टाईल मारणं महागात पडलं होतं. 

Read More