Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने

अर्थसंकल्पाच्या चर्चेवरून पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले.

पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने

पिंपरी - चिंचवड : अर्थसंकल्पाच्या चर्चेवरून पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले.

सत्ताधारी वारंवार सभा तहकूब करून चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 

विरोधकांनी केले आरोप 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 15 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला. 28 तारखेला त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र त्या दिवशी श्रीदेवी यांच्यावर होणा-या अंत्यविधीमुळे ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी 9 मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित होती.

पण ती सभाही माजी नगरसेवकाच्या मृत्यूमुळे तहकूब करण्यात आली. आता पुढची सभा 20 मार्चला 11 वाजता ठेवण्यात आली आहे. 

Read More