एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत्या खोलीत गळफास घेऊन 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटीयन मार्केटजवळील ही घटना आहे. ज्ञानेश्वरी शिरसागर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मुळची अहिल्यानगरची रहिवाशी होती गेल्या दोन महिन्यांपासून ती नाशिकच्या एका खाजगी होस्टेलमध्ये राहत होती. दरम्यान तिच्या आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.