Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भारतीय बेदाण्यांवर ड्रॅगनचा डोळा ! चायनिज बेदाण्यामुळे देशी बेदाण्यावर संक्रांत

कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजारपेठ काबीज करतोय. त्यामुळे भारतातल्या विशेषत: महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

भारतीय बेदाण्यांवर ड्रॅगनचा डोळा ! चायनिज बेदाण्यामुळे देशी बेदाण्यावर संक्रांत

सरफराज सनदी (प्रतिनिधी) सांगली : चिनी बेदाण्यानं सध्या भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची झोप उडवलीय. कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजारपेठ काबीज करतोय. त्यामुळे भारतातल्या विशेषत: महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

चीनमुळे सध्या भारतातले विशेषत: महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादकांची डोकेदुखी वाढलीय. कारण चिनी बेदाणा भारतात आलाय.. तोही चोरट्या मार्गानं परिणामी कुठलंही शुल्क भरावं लागत नसल्यानं त्यांचे दर आपल्या बेदाण्याच्या तुलनेत खूपच कमी आहेत. नेपाळ, भूतान,बांगलादेश मार्गे भारतात येणारा हा बेदाणा निकृष्ट दर्जाचा तर आहेच पण रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे आरोग्याला हानिकारकच. पण कमी किमतीत मिळत असल्यानं ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे आपला दर्जेदार बेदाणा भाव मिळत नसल्यानं खरेदी अभावी पडून आहे. अडीचशे ते तीनशे रुपये किलो दरानं चिनी बेदाण्याची विक्री सुरू आहे.त्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात 70 ते 100 रुपयापर्यंत घट झालीय.

यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी असल्यानं शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत होता, मात्र गेल्या एक महिन्यापासून चिनी बेदाण्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यामुळे त्यांच्या बाजूनं आता व्यापारीही मोर्च्यात सहभागी झालेत. चिनी ड्रॅगनच्या बेदाण्यानं आपल्या बेदाण्याचे भाव कोसळले. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी केंद्र सरकारकडे आशेनं पाहतात. स्वदेशीचा नारा देणाऱ्या सरकारनं कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

FAQ : 

1. चिनी बेदाणा भारतात कसा येतो?

चिनी बेदाणा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशमार्गे चोरट्या पद्धतीने भारतात येतो. यामुळे त्यावर कोणतेही आयात शुल्क लागत नाही, ज्यामुळे त्याची किंमत खूप कमी आहे.

2. चिनी बेदाण्याच्या किमतीचा भारतीय बेदाण्यावर काय परिणाम झाला आहे?

चिनी बेदाणा 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, ज्यामुळे भारतीय बेदाण्याच्या किमतीत 70 ते 100 रुपयांपर्यंत घट झाली आहे. यामुळे भारतीय बेदाणा बाजारात खरेदी अभावी पडून आहे.

3. चिनी बेदाण्याच्या दर्जाबाबत काय समस्या आहे?

चिनी बेदाणा निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याने तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरीही कमी किमतीमुळे ग्राहक त्याला प्राधान्य देतात.

Read More