Indian money in Swiss banks: स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढल्याची माहिती समोर आलीय. हा पैसा तिप्पट वाढून 37 हजार कोटी रुपये झालाय. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला असल्याचे बँकेने म्हटलंय.
2024 मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढून 3.5 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजेच(37.600 कोटी रुपये) झाला. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. हे 2023 मध्ये हे पैसे फक्त 1.04 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 11,000 कोटी होते. हे पैसे भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचे आहेत, जे स्विस बँकांमध्ये जमा आहेत.
भारतातील लोक किंवा उद्योजक आपला पैसा देशात न ठेवता स्विक बँकमध्ये का ठेवतात? अशी चर्चाही करण्यात येते मात्र त्याचं कारण असं आहे.
स्वित्झर्लंडमध्ये अशा बँका आहेत. ज्या त्यांच्या कडक गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी ओळखल्या जातात. लोक या बँकांमध्ये त्यांचे पैसे जमा करतात कारण त्यांच्या खात्यांची. माहिती कोणालाही दिली जात नाही अगदी खातेदाराच्या देशाला किंवा सरकारलाही नाही.
स्विस बँकांतील एकूण परदेशी ठेवींमध्ये भारताचा वाटा वाढला असून भारताची रँक 2023 मध्ये 67 व्या स्थानावर होती ती 2024 मध्ये 48 व्या स्थानी आली आहे.. त्यामुळे स्विस बँकेत भारतीयांच्या वाढत्या रकमेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसंच स्विस बँकेतील भारतीयांच्या वाढत्या पैशांवरून अंजली दमानियांनी देखील केंद्र सरकारवर टीका केलीय.