Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शहीद मुरली नाईक यांचा 'तो' व्हिडीओ कॉल ठरला अखेरचा; 25व्या वर्षी आले हौतात्म

India-Pakistan War: पहलगाम हल्ल्याच्या निषेधात भारतानं भारताच्या ऑपरेशन सिंदुरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाईनंतर दोन्ही देशांत तणाव पाहायला मिळतोय.

शहीद मुरली नाईक यांचा 'तो' व्हिडीओ कॉल ठरला अखेरचा; 25व्या वर्षी आले हौतात्म

India-Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर लक्ष्य करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर हल्ले केले जात आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानकडून सातत्याने जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार केला आहे. पाकच्या या हल्ल्यात मुंबईचा एक जवान शहीद झाला आहे. मुरली नाईक असं त्यांचे नाव असून ते मुळचे आंध्र प्रदेशचे आहेत. मुंबईत घाटकोपर येथे ते कुटुंबासह राहत होते. 

सैनिक मुरली नाईक हे कुटुंबासह मुंबईतील कामराजनगर आणि घाटकोपरमध्ये वास्तव्यास होते. कामराजनगरच्या अगदी दहा बाय दहाच्या घरात मुरली लहानाचा मोठा झाला. मुरली घरातील एकुलता एक मुलगा आहे. भारत -पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र, देशाला माझी गरज आहे ते माझं कर्तव्य आहे. मी व्यवस्थित परत येईन, असं म्हणत त्याने आईची समजूत काढली होती. त्यानंतर ते उरी येथे गेले होते. हल्ल्याच्या काही तासांपूर्वीही आईला व्हिडिओ कॉल करत त्यांनी संवादही साधला होता. मात्र तो संवाद अखेरचा ठरला. मुरली नाईक यांच्या वडीलांनीही मुलगा देशासाठी शहीद झाला याचा अभिमान असल्याचे सांगितले. 

मुरली यांनी 2022मध्ये आर्मी जॉइन केली होती. ते 851 लाइट रेजिमेंटमध्ये होते. त्यांचे वडील पुदावत श्रीराम आणि ज्योतिबाई हे मजुरीचे काम करत होते. मुरली त्यांचा एकुलता एक मुलगा होते. 6 जानेवारी 2025 रोजी ते 10-15 दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा ते घरी गेले होते. मुरली यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता त्यांच्या आईला फोन करुन सांगितले की, 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास मुरली युद्धादरम्यान शहीद झाले. मुरली यांच्या काकांच्या मुलाने सांगितले की, गुरुवारी त्याचा शेवटचा फोन आला होता. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की सीमेवार हेवी फायरिंग सुरू आहे.

Read More