Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नशिबात असलं तरी कायद्यात बसणार नाही! सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालच्या जमिनीवर मालकी सरकारची?

जमिनीच्या आत सापडलेल्या पैशांवर किंवा खजिन्यावर सरकारचा अधिकार असतो. एखाद्याला जमिनीत सोने किंवा तत्सम वस्तू सापडल्यास ती सरकारी तिजोरीत जमा केली जाते. काय आहे यासंदर्भातील कायदा. 

नशिबात असलं तरी कायद्यात बसणार नाही! सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालच्या जमिनीवर मालकी सरकारची?

Indian Treasure-Trove Act, 1878 : छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बु-हाणपूरमधील लोकांनी मुघल काळातील खजिन्याच्या शोधासाठी खोदकाम केले. एक दोन खड्डे नव्हे तर तब्बल 100 खड्डे या ठिकाणी खोदलेत. मुघलांचा खजिना मिळेल या आशेने गावकरी रात्रभर खोदकाम करत होते. खोदकामात कुणालाही सोन्याचं तर सोडाच पण साधं पितळ्याचंही नाणं सापडलं नाही. पण, समजा कुणाला खजिना सापडलाचं असता तरी तो त्यांना मिळाला नसता. अगदी जमिनीच्या मालकालादेखील यावर दावा करता आला नसता. कारण, नशिबात असलं तरी कायद्यात बसणार नाही.  सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालची जमिन सरकारची असते. जाणून घेऊया काय आहे भारतीय निखात-निधी अधिनियम कायदा. 

एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीत सोने किंवा खजिना सापडला आणि त्याने त्यावर मालकीचा असल्याचा दावा केला तर हे प्रकरण न्यायालयात जाते. न्यायालयात सिद्ध केल्यानंतर सापडलेल्या वस्तू त्याच्या होतात. परंतु त्याने जमिनीत सापडलेल्या वस्तूंविषयी माहिती लपवली तर संबधीत व्यक्ती कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. पोलीस त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकतात.

भारतात सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू सापडण्याच्या संबंधी 'Indian Treasure-Trove Act, 1878' (Amending Act Xll of 1891) हा कायदा अस्तित्वात आहे. कायद्यातील "Treasure Trove" हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे. 'सापडलेला खजिना' या अर्थाने हा शब्द वापरला जातो. मराठीत या कायद्याला 'भारतीय निखात-निधी अधिनियम 1878' असे म्हणतात. "निखात" याचा अर्थ मृदेमध्ये किंवा तिच्याशी निगडित असलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये दडलेला कोणताही 'जिन्नस' असा आहे.
कायद्यानुसार जर एखाद्याला खजिना सापडला तर त्याची माहिती सरकार किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. माहिती लपविल्यास संबधीत व्यक्ती संकटात सापडू शकते. सरकार संबधीत व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करु शकते. किंवा तुरुंगवासची शिक्षा देखील होऊ शकतो.

'भारतीय निखात-निधी अधिनियम या कायद्यानुसार जमिनीत दडलेल्या कोणत्याही वस्तू सापडल्या तर त्याला 'खजिना' असे संबोधले जाते. जर अशा वस्तूचे मूल्य 10 रूपयांपेक्षा जास्त असेल, तर जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला त्वरित सूचना देणे आवश्यक आहे. कायद्यानुसार गुन्ह्यासाठी दंडासह किंवा त्याशिवाय एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. गुन्ह्याची दखलपात्र आणि अजामीनपात्र अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

एखाद्या व्यक्तीला जमिन खोदताना किंवा जमिनीचे सपाटीकरण करताना किंवा शेतात उत्खनन करताना सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा खजिना सापडला तर सर्वप्रथम संबधित व्यक्तीने याबाबत कायद्यानुसार सूचना देणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती  मिळाल्यावर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होतात.  सापडलेले सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू जप्त करतात. नंतर याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला जातो. जर जमिनीचा सातबारा एखाद्या व्यक्तीच्या नावावर असला तरी 3.5 फूट खोली नंतरची मालकी ही सरकारची असते असे देखील सांगितले जाते. 

Read More