Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पाकिस्तानच्या जेलमधून भारतीय महिलेची 18 वर्षानंतर सुटका

गेली अठरा वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) जेलमध्ये असलेल्या एका 65 वर्षीय महिलेची नुकतीच पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाली आहे. 

पाकिस्तानच्या जेलमधून भारतीय महिलेची 18 वर्षानंतर सुटका

औरंगाबाद : गेली अठरा वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) जेलमध्ये असलेल्या एका 65 वर्षीय महिलेची नुकतीच पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाली आहे. (Indian woman released from Pakistani jail after 18 years) आता ती मायदेशात परतली. 2002मध्ये ही महिला पाकिस्तानमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला गेली होती. मात्र पाकिस्तानमध्ये पोहोचल्यावर तिचा पासपोर्ट हरवला. पोलिसांना ती महिला संशयास्पद वाटली आणि तिला पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं.

तब्बल अठरा वर्ष या महिलेने पाकिस्तानच्या जेलमध्ये घालवले आणि त्यानंतर नुकतीच तिची सुटका झाली आहे. पाकिस्तानहुन अमृतसरला ही महिला आली आणि तिथून रेल्वेने आता औरंगाबादला पोहोचली आहे. औरंगाबादला आल्यावर आपल्या देशात आल्यावर स्वर्गात आल्यासारखे वाटत असल्याची भावना या महिलेने व्यक्त केली आहे.

18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये माझे खूप हाल झाले मात्र आज आपल्या देशात आल्यावर खूप आनंद होत असल्याचंही महिला सांगते. हसीना दिलशाद अहमद असे या महिलेचे नाव आहे आणि औरंगाबादमध्ये ही महिला आपल्या भाच्याच्या घरी आली आहे. ती पाकिस्तानमधील लाहोर कारागृहात होती.

Read More