Mumbai-Nagpur In 2 Hours: पुणे आणि नागपूरदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरु झाल्यानंतर आता मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव साडेतीन वर्षापासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 ऑगस्ट रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत.
नागपूर जिल्ह्यात या मार्गातील 111 किलोमीटरचा ट्रॅक असणार असून तो समृद्धी महामार्गालगत बांधणीचा विचार होऊन साडेतीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर ऑफिसही सुरू करण्यात आले होते. ते कार्यालय आता पालकमंत्री कक्षासाठी वापरले जात असल्याचे समजते.
या महत्त्वकांशी प्रकल्पासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, समृद्धी महामार्गाला लागून समांतर हायस्पीड रेल्वे ताशी 330 ते 350 किलोमीटर प्रतीतास वेगाने धावेल असा प्रस्ताव होता. म्हणजेच या वेगाने ही ट्रेन दोन ते सव्वा दोन तासात मुंबई ते नागपूर अंतर कापेल. समृद्धीचे बांधकाम होत असताना रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबई हायस्पीड रेल्वेवर अभ्यास केला आहे. 78 टक्के काम गतीने होणे शक्य होते. 22 टक्के काम सयुंक्तपणे करावे लागणार आहे. याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> ना PM, ना रेल्वेमंत्री, ना CM... 'या' व्यक्तीचं ऐकून 'मरे' चालवणार CSMT-खोपोली 15 डबा लोकल; प्लॅन जाहीर
या मार्गावर एकूण 14 ठिकाणी विशेष रेल्वे स्टेशन उभारली जाणार आहेत. ही रेल्वे स्टेशन कोणती असतील त्याची यादी खालीलप्रमाणे
अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, ठाणे
हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्पाचे तपशील खालीलप्रमाणे:
> एकूण लांबी : 749 किलोमीटर
> किती स्थानके? : 12
> किती जिल्हे जोडणार? : 10
> भूसंपादन किती ? : 1245.61 हेक्टर
> रेल्वेचा ताशी वेग किती ? : 330 ते 350 कि.मी.
> प्रवासी वाहतूक क्षमता : 750
> एकूण किती बोगदे? : 15,
> बोगद्यांची लांबी : 25.23 कि. मी.
> समृद्धी महामार्गालगत - 17.5 मीटर रुंदीचा मार्ग
1. हा रेल्वे प्रकल्प आहे तरी काय?
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे हा एक प्रस्तावित प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेद्वारे जोडेल. हा प्रकल्प समृद्धी महामार्गालगत बांधला जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
2. या प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे?
प्रकल्पाची एकूण लांबी 749 किलोमीटर आहे.
3. या मार्गावर किती रेल्वे स्थानके असतील?
या मार्गावर एकूण 14 विशेष रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत: अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, आणि ठाणे.
4. हायस्पीड रेल्वेचा वेग किती असेल?
या रेल्वेचा ताशी वेग 330 ते 350 किलोमीटर प्रति तास असेल, ज्यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास 2 ते 2.25 तासांत पूर्ण होईल.
5. या रेल्वेची प्रवासी वाहतूक क्षमता किती असेल?
या रेल्वेची प्रवासी वाहतूक क्षमता 750 प्रवाशांपर्यंत असेल.
6. या मार्गावर किती बोगदे बांधले जाणार आहेत?
या मार्गावर एकूण 15 बोगदे बांधले जाणार असून, त्यांची एकूण लांबी 25.23 किलोमीटर असेल.