Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुजोर तरुणाविरोधात गुन्हा दाखल

मास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने देखील नागरिकांना मध्ये जनजागृतीचे नियम पालन करण्याचे ,मास्क वापरण्यासह सोशल डिस्टनसींगचे पालन करावे असे आवाहन केलं आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिकांकडून निष्काळजीपणा सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईस काही मुजोर बेजबाबदार नागरिक विरोध करतात त्यातूनच अनेकदा वाद घडताना दिसतात .

उल्हासनगरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत या मुजोर तरुणाने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत जाऊन त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. उल्हासनगर श्रीराम चौक येथे पोलिसांची कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान विना मास्क दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असताना या दोन मुजोर तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More