Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दांडिया असेल तिथे मंडपाबाहेर रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.  दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे.  

दांडिया असेल तिथे मंडपाबाहेर रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Navratri 2023: सर्वांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. 15 ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सव सुरु होत आहे. नवरात्र उत्सवा निमित्ताने राज्यभरात दांडिया रास तसेच गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा देणे बंधनकारक

राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठया प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाचा जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात

रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तसेच कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

गौतमी येत असल्याने डिस्को दांडियाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

सोलापुरात गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला नकार दिला. स्थानिक डिजीटल वृत्तवाहिनीच्या डिस्को दांडियाचं गौतमीला आमंत्रण होतं प्रमुख पाहुणी म्हणून तिला बोलावलेलं.मात्र नवरात्र आहे त्यामुळे पोलिसांवर ताण येईल असं सांगतं तिच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नकार दिलाय. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जातेय.

 

Read More