Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संध्याकाळ होताच उस्मानाबादमधल्या 'या' गावात TV आणि Mobile होतात बंद, कारण थक्क करणारं

 धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुर वाडी ग्रामपंचायत ने अनोखा निर्णय घेतला आहे .या गावात दररोज संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान अख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद ठेवला जातो. 

संध्याकाळ होताच उस्मानाबादमधल्या 'या' गावात TV आणि Mobile होतात बंद, कारण थक्क करणारं

ज्ञानेश्वर पंतगे, झी मीडिया, उस्मानाबाद : सध्याची पिढी टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेली आहे. या सर्वाधिक परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. टीव्ही आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे मोठ नुकसान होत आहे.  यामुळेच उस्मानाबादमधील (Osmanabad) उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतीने (Jakekurwadi Gram Panchayat of Umarga)अभ्यासासाठी गावात दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद(switch off TV and mobile phones for two hours) करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्ही आणि मोबाईल मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुर वाडी ग्रामपंचायत ने अनोखा निर्णय घेतला आहे .या गावात दररोज संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान अख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद ठेवला जातो. 

ग्रामपंचायतर्फे भोंग्यावरून दररोज हा संदेश दिला जातो. अख्ख गाव या दोन तासात मोबाईल किंवा टीव्ही वापरत नाही . एवढेच नाही तर गावातील मंदिरामध्येही भोंग्यावरून पूजा केली जात नाही. त्यामुळे मुलंही या दोन तासात अभ्यास करतात.
मुलांच्या अभ्यासासाठी जेकेपूर ग्रामपंचायत तिने घेतलेला हा निर्णय नक्कीच आदर्शवत आहे. मुलांच्या अभ्यासासाठी गावामध्ये दोन तास टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा ठरावच गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये घेतला आहे.

 

Read More