Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

फटकळ बोलतो म्हणून दूर सारलो गेलो-एकनाथ खडसे

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बाहेर काढलीय.

फटकळ बोलतो म्हणून दूर सारलो गेलो-एकनाथ खडसे

जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बाहेर काढलीय. खडसे मंत्री नाहीत म्हणून गेल्या दोन वर्षात सगळं बिघडलंय. आपण फटकळ बोलतो त्यामुळं दूर सारलो गेलोय. परंतु मंत्री नसलो तरी काही फरक पडत नाही. खुर्चीचे आपण भुकेले नाहीत, लोकांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्यांबाबत तक्रार करू असं वक्तव्य करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा स्वकीयांवर तोफ डागलीय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे परिसरातील बूथ समिती प्रमुखांच्या मेळाव्यात खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला. 

Read More