Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एसटी पेटवली, राज्य परिवहन मंडळाचं लाखोंचं नुकसान

 एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात घडलाय.

एसटी पेटवली, राज्य परिवहन मंडळाचं लाखोंचं नुकसान

विकास भदाणे, जळगाव : राज्य परिवहन मंडळाची मुक्कामी एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात घडलाय. पहाटे दोन वाजता ही घटना घडलीय. रात्री सार्वजनिक पाणीपुरवठाच्या नळाचे पाणी सोडल्यानंतर गावकऱ्यांनी जळालेली बस विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच बस पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडली होती. त्यामुळं काही क्षणांतच या बसचा कोळसा झाला.

लाखोंच नुकसान 

सुदैवानं गाडीच्या कॅबिनकडच्या भागाला आग लागली नाही तसंच डिझेल टॅंक देखील या आगीपासून वाचल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकी ही आग कोणी तसंच कशामुळे लागली याचा तपास पोलिस करीत आहेत.

Read More