Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने छळ; सूनेने उचललं भयंकर पाऊल, सासू अन् नणंदेने...


Jalgaon News Today: जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने छळ; सूनेने उचललं भयंकर पाऊल, सासू अन् नणंदेने...

Jalgaon News Today: जळगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील किनोद येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गायत्री कोळी 26 असं विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, गायत्रीने आत्महत्या केली नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा दाबून हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. 

गायत्रीच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना खाण्यास नकार दिला होता.  यावरून किरकोळ वाद झाला होता. मात्र पुढे हा वाद विकोपाला गेला. हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे

सासरच्या दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्र मयत गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी घेतला आहे. या घटनेचा पोलिस करत आहेत. 

तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नागपुरातील भांडेवाडी परिसरात काल रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. सतीश मेश्राम (31 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो बांधकाम साइटवर काम करायचा. दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याच प्रयत्नात पारडी पोलीस स्टेशनमध्ये तो मिसिंग असल्याची तक्रार ही देण्यात आली होती. काल रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना सतीशच्या मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सतीश ची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

Read More