Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आरोपींचीही नग्न धिंड काढून व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर टाकण्याची मागणी

त्यांनाही तसचं मारून त्यांचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकावा अशी मागणी केलीय.

आरोपींचीही नग्न धिंड काढून व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर टाकण्याची मागणी

विकास भदाणे, झी मीडिया, मुंबई : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या वाकडीत मारहाणीच्या घटनेनंतर आता आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केलीय. पीडित मुलांच्या आईनं ज्यांनी माझ्या मुलांची नग्न धिंड काढली, त्यांनाही तसचं मारून त्यांचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकावा अशी मागणी केलीय. घटनेनंतर गावात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील प्रकरणाला आता वेगळं वळणं मिळतंय. विहिरीचे पोहण्यासाठी १२ ते १५ मुलं असताना केवळ मातंग समाजाच्या मुलांना नग्नावस्थेत मारहाण करण्यात आली, असा आरोप  कुटुंबीयांनी केलाय. दरम्यान, १५ फूट खोल विहिरीत मुलं पोहली असताना पोलिसांनी पंचनाम्यात ८० फूट खोल विहिरीत मूलं पोहयाला आल्याचा खोटा पंचनामा पोलिसांनी केल्याचाही आरोप पीडित कुटुंबीयांनी केलायं.

गिरीश महाजनांनी घेतली भेट 

वाकडी गावात भेट देऊन पीडित कुटुंबीयांची विचारपूस करत आहेत. . जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज पीडित कुटुंबियांची भेट घेतली.  किशोरवयीन मुलांना नग्नावस्थेत पट्ट्याने तसंच काठीने बेदम मारहाण करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होतोय.

Read More