Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जळगाव | शेंदुर्णी नगरपंचायत निकाल, भाजपाने गड राखला

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने गड राखला आहे, नगराध्यक्षपदी भाजपाच्या विजया खडसे विजयी झाल्या आहेत.

जळगाव | शेंदुर्णी नगरपंचायत निकाल, भाजपाने गड राखला

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने गड राखला आहे, नगराध्यक्षपदी भाजपाच्या विजया खडसे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या क्षितिजा गरूड यांना त्यांनी २ हजार मतांनी पराभूत केलं आहे. गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा यासाठी पणाला लागली होती, अखेर त्यांनी शेंदुर्णात गड राखला आहे. 

अवघ्या जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या शेंदूर्णी लागलं होतं. नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा सफाया केला. आघाडीला फक्त ४ जागा राखता आल्या. राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेसला एका जागेवर यश आलं आहे.

Read More