Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात! धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला; रुळावरुन ट्रक 500 मीटर फरफटत गेला

महाराष्ट्रात जळगावजवळ मोठा अपघात झाला आहे. धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला आहे. 

 महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात! धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला; रुळावरुन ट्रक 500 मीटर फरफटत गेला

Jalgaon Railway Accident : रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात झाला आहे. जळगावात मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला आहे. एक भरधाव वेगात असलेला ट्रक रेल्वे रुळवार घुसला आणि अमरावती एक्स्प्रेसला धडकला. या दुर्घटनेमुळे अनेक रेल्वे खोळंबल्या. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. 

शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला.  मुंबई अमरावती एक्सप्रेसने (12111)  गव्हाने भरलेला ट्रक सुमारे 500 मीटर फरफटत नेता. ट्रक चालकाने बंद रेल्वे गेट तोडून ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा अपघात झाला, पण अचानक समोरून एक हाय स्पीड ट्रेन आली. ट्रेन आणि ट्रकची जोरदार धडक होती. या धडकेत ट्रेनना ट्रकला 500 मीटरपर्यंत फरफटत नेले. 

बोदवड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक सध्या बंद आहे कारण तिथे नवीन पूल बांधण्यात आला आहे. तथापि, स्थानिक वाहनचालकांना या बदलाची पूर्णपणे जाणीव नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी गव्हाने भरलेला ट्रक घेऊन जाणारा एक ट्रकचालक रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा अपघात झाला.

रेल्वे रुळावर च्रक पाहून मोटरमनने तात्काळ ट्रेनचा स्पीड कमी केला. मात्र, तो पर्यंत ट्रेन आणि ट्रकची धजक झालेली होती. यामुळे ट्रेनचा स्पीड देखील कमी झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ट्रेकचे मोठे नुकसान झाले आहे. 
या अपघातानंतर  ट्रक रेल्वेत अडकून पडल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली. मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर याचाचा परिणाम झाला. मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेरीस दुपारी हा ट्रक बाजूला हटवण्यात आला. यानंतर या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

 

Read More