Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जळगावात वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

जळगावमध्ये 2 तर साक्रीमध्ये 1 जणाचा मृत्यू

जळगावात वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

जळगाव : वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. बोदवडपासून जवळच असलेल्या शेलवड इथली ही घटना आहे. मुसळधार पावसात अंगावर वीज कोसळून जितेंद्र सुभाष माळी आणि शंकर प्रभाकर वाघ या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात जोरदार पावसात वीज कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला. 

साक्री तालुक्यातल्या घाणेगाव इथे खोदकाम करणाऱ्या दादाभाई भिवसिंग ठाकरे या मजुराचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. तर इच्छापूर जवळच्या लखमापूर इथे जंगलात बंडू सोमा बाचकर हा मेंढपाळ वीज पडून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Read More