Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

VIDEO: कोयते विकण्याच्या बहाण्याने आले, गणपती मंदिरात शिरले आणि...' ऐन उत्सवात धक्कादायक प्रकार

Jalna Crime: मुकुट सापडत नाही तोपर्यंत गावातील गणपती विसर्जन न करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय.

VIDEO: कोयते विकण्याच्या बहाण्याने आले, गणपती मंदिरात शिरले आणि...' ऐन उत्सवात धक्कादायक प्रकार

Jalna Crime: कोयते विकण्याच्या बहाण्याने गावात आले, गणपतीचा चांदीचा मुकूट चोरून घेऊन गेले, अशी घटना समोर आली आहे. यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे. चोरट्यांचा गणपतीच्या चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पंचमुखी गणपती मंदिरात ही घटना घडली. मुकुट चोरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.मुकुट आणि चोरटे तातडीनं शोधण्याची मोहिम सुरु झाली आहे. मुकुट सापडत नाही तोपर्यंत गावातील गणपती विसर्जन न करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

चांदीचा मुकूट चोरीला

जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरी गावातील पंचमुखी गणपती मंदिरातून चांदीचा मुकूट चोरीला गेलाय.विशेष म्हणजे दिवसाढवळ्या हा मुकूट चोरीला गेला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये.चोरटे गावात लोखंडी कोयते विक्रीसाठी गावात आले होते.सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील एका चोरट्याच्या हातात कोयते असल्याचं दिसून येतंय.

सर्व सदस्य पदाधिकारी कामात व्यस्त 

पंचमुखी महादेव मंदिरात आज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं या कार्यक्रमात गणेश मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी कामात व्यस्त होते.त्यावेळी गणपती मंदिरात चोरट्यांनी प्रवेश केला आणि मुकूट चोरून नेला.

तोपर्यंत तोपर्यंत गणेशमूर्तींचं विसर्जन नाही

दरम्यान ही घटना उघकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून जोपर्यंत मुकूट मिळत नाही तोपर्यंत गणेशमूर्तींचं विसर्जन केलं जाणार नाही असा आक्रमक पवित्रा संपूर्ण गावकर्यांनी घेतल्याची माहिती ग्रामस्थ शैलेंद्र पवार यांनी दिली.

Read More