जालनामध्ये सूनेने 45 वर्षीय सासूचं डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सासूची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेच्या माहेरच्यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. सासूची मारेकरी आमची लेक असू शकत नाही. एवढंच नाही तर आम्ही तिचे पिंडदान केले असून ती आमच्यासाठी मेली अशी प्रतिक्रिया आरोपी प्रतीक्षा शिनगारे हिच्या माहेरच्यांनी दिली आहे. यामुळे तिचा जामीनघेण्यासाठीही कुणी नातेवाईकआले नाहीत.
सतत होणाऱ्या वादामुळे आरोपी प्रतिक्षा या सुनेने 45 वर्षीय सासू संगीता संजय शिनगारे यांचं डोकं भिंतीला आपटून चाकूने वार करुन खून केला. या घटनेतील आरोपी सुनेला न्यायालयात हजर केले असता 7 मार्चपर्यंत तिला पोलिस कोठडी मिळाली आहे. प्रतीक्षा आकाश शिनगारे असे आरोपी सुनेचे नाव आहे. सविता संजय शिनगारे (४४, आंतरवाली बु., ता. गेवराई,जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे.
जालना शहरातील प्रियदर्शिनी कॉलनीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सासू-सून राहत होत्या. मुलगा नोकरीला लातूर येथे होता. घरी दोघीच होत्या. सून मोबाइलवर इतरांसोबत बोलत होती. यावरूनच दोघींमध्ये वाद झाला होता. यानंतर दोघींमध्ये कडाक्याचे भांडण होऊन नंतर यावादाचे रूपांतर खुनात झाले. खून करून प्रतीक्षा शिनगारे माहेर असलेल्या परभणी येथे पळून गेली होती. परंतु, पोलिसांनी तिला गुरुवारीच अटक केली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी 3 वाजता तिला न्यायालयात हजर केले होते.
माहेर असलेल्या परभणी येथून अटक करण्यात आल्यानंतर मेडिकल करण्यात आले. खून करते वेळी झालेल्या झटापटीत आरोपी प्रतीक्षा हिच्या उजव्या हाताच्या बोटाला चाकू लागला आहे. त्याचा मेडिकल रिपोर्टही न्यायालयात पोलिसांनी सादर केला आहे.
जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडलीये. संगिता संजय शिनगारे असं या मयत महिलेचं नाव असून प्रतीक्षा शिनगारे असं खुन करणाऱ्या आरोपी सुनेचं नाव आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी काॅलनीत ही घटना घडली आहे.भिंतीवर डोकं आपटून सुनेकडून सासूची हत्या करण्यात आली. गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला न आल्यानं मृतदेह घरातच सोडून सून फरार झाली. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान पोलिसांनी फरार सुनेचा शोध घेतला असून तिला परभणीतून ताब्यात घेण्यात आलंय