Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जामनेर नगरपरिषद निवडणूक : गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना विजयी

जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या  चौथ्या फेरीत भाजपचे सर्व  उमेदवार २४ जागांवर निर्णायक आघाडीवर आहेत.

जामनेर नगरपरिषद निवडणूक : गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना विजयी

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जामनेर नगरपरिषद निवडणुकीत सर्व २४ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना ८ हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहे. साधना महाजन यांनी राष्ट्रवादीच्या प्राध्यापक अंजली पवार यांचा पराभव केला. यामुळे पुन्हा जामनेर नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या गिरीश महाजन यांच्याकडे राहणार आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे सत्ता पुन्हा आल्याने शहर विकासाला चालना मिळेल असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

महाजन यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार प्राध्यापक अंजली पवार यांनी देखील साधना महाजन यांना सुरूवातीला काटे की टक्कर दिल्ल्याचं म्हटलं जात आहे.

Read More