Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Jejuri Temple Dress Code: 'हे' कपडे घालून गेलात तर खंडेरायाचं दर्शन मिळणार नाही

Jejuri Temple Dress Code: दरवर्षी जेजुरीमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. आता येथे येणाऱ्या सर्व भाविकांना नव्या नियमाचं पालन करावं लागणार आहे.

Jejuri Temple Dress Code: 'हे' कपडे घालून गेलात तर खंडेरायाचं दर्शन मिळणार नाही

Jejuri Temple Dress Code: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.

कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही

भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे.

कोणते कपडे चालणार नाहीत?

गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे, असं जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकातेंनी म्हटलं आहे.

तृप्ती देसाईंचा विरोध

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी या निर्णयाला विरोध केला आहे. "जेजुरीच्या खंडोबा देवस्थानने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. मंदिरात जातांना कोणीही तोकडे कपडे घालून जात नाही. असं असताना हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून असे निर्णय भक्तांवर लादले जात आहेत. वस्त्रसंहितेच्या नावाखाली घेण्यात आलेला हा  निर्णय जेजुरी देवस्थानकडून मागे घेण्यात यावा, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.

दहा दिवस यात्रा व जत्रा

खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती या ठिताणी करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून लाखो उपासक जेजुरीला येतात. 

Read More