Jitendra Avhad Exclusive Interview: विधानभवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली. हा मला मारण्याचा कट होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. या विषयासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी झी 24 तासला मुलाखत दिली. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? जाणून घेऊया.
अशा घटना कधी घडत नाहीत. आम्ही आत भांडलो तरी बाहेर येऊन हात मिळवतो. आम्ही चड्डी बनियान गॅंग, ओम फट स्वाहा म्हणालो मग यांनी आम्हाला मारायचं का? मी फक्त मंगळसूत्र चोर म्हणालेलो, मी कोणचं नाव घेतलं होतं का? पण मला बोलायचं नाहीय. गेले 4 दिवस माझ्याकडे बघून उद्गार टाकले जात होते. मी शांतपणे बघत होतो. आज मी सभागृहातून बाहेर चाललेलो तेव्हा नितीनला मारल्याचं कळालं. मी सापडलो म्हणून माझ्या कार्यकर्त्यावर हात उचलण्याचा प्रकार झाल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आपल्याकडे कोण बघत असतात हे सगळ डोक्यात ठेवण्याचा कोणाकडे वेळ नाही. माझ्यासोबत जे घडलं ते मी सांगितलं. माझा कोणाकडेही रोख नाही. मला काही बोलायचंच नाही. कोणी बोट दाखवलं हे सर्वांना परफेक्ट माहिती आहे. माझा एकच कार्यकर्ता तिथे उभा होता. त्याच्यासोबत कोणी नव्हत. त्याने एकट्याने मार खाल्ला. मारणारे कोण होते? त्यांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रासमोर व्हिडीओ गेलाय. हृषीकेश टकले कोणासोबत होता, त्याची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. तुम्ही मला कितीही बोलतं केलत तरी मी यावर बोलणार नाही, असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना आम्ही वेगवेगळ्या आंदोलनात आक्रमक होताना पाहिलंय. आज आम्ही तुमचं गांधीवादी रुप पाहिलंय. तुमच्याकडून हे प्रकरण मिटलंय, असं म्हणायचं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मी 25 वर्षे आमदार आहे. माझ्याकडून अशी वर्तवणूक झालेली नाही. हे लोकशाहीचं मंदीर आहे. याचं पावित्र्य राखणं त्याचा भक्त म्हणून माझी जबाबदारी आहे. मकोकाचे आरोपी घेऊन उभे राहणाऱ्यांना महाराष्ट्र बघेल. मी कोणाशी काहीही बोललेलो नाही, असे ते म्हणाले.
विधानभवनाच्या प्रांगणामध्ये थिल्लरपणाच्या घटना घडतात. कोंबडी चोर, चड्डी बनियान घोषणा देणं पार्लीमेंट्री आहे का? लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आमदारांचा अधिकार असला तरी असे शब्द योग्य आहेत का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही पार्लिमेंट्री भाषेत बोलतो. घोषणा देणं हा आमचा अधिकार आहे. चड्डी बनियानमधील माणूस कॅन्टीन कर्मचाऱ्याला फाईट मारत असले तर प्राथिनिधीक स्वरुपात त्याला उघड करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कोणाला काळी पूजा करताना पाहिलं तर प्राथमिक स्वरुपात आंदोलन केलं, त्यात काही चुकीचं नाही. यानंतर राग व्यक्त झाला नाही. आतमध्ये जाऊन आम्ही एकमेकांना टाळ्या दिल्या. हास्यविनोद हा प्रांगणातील भाग आहे. काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही या सांगितलं. हलक्या भाषेत मुख्यमंत्र्यांनी केलेला विनोद आहे. याला गांभीर्याने घ्यायला नको, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी वेगळ्या विषयावर भेट झाली त्यावेळी विधिमंडळातील हाणामारीचाही विषय निघाला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटना शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, जे घडलं ते योग्य झालं नाही. मोक्काचे आरोपी जर विधिमंडळात येऊन बसणार आहेत. तर मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर माझा कार्यकर्त्या नितीन देशमुख यांना मारण्यात आलं. यापेक्षा वाईट गोष्ट नाही. गेल्या तीन दिवसांपासून मी पाहतोय, हे लोक मला डोळे वटारून पाहत होते. यावेळी तर यांनी सीमा पार केली आहे. माझा सभागृहातील भाषण झाल्यावर मी त्वरित बाहेर पडून गाडीत बसणार तोच मला फोन आला की नितीनला मारलं आणि मी परत आलो. मी तिथे आल्यावर जी काही घटना कळली आणि व्हिडीओ पाहिला. त्यात नितीन देशमुख यांच्यावर सरळ सरळ हल्ला झाल्याच दिसून आला आहे. त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याच होतं. कोण आहेत ही माणसं? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खूनातील, दरोडे आणि मोक्कातील आरोपी आहेत. मोक्कातील आरोपी विधिमंडळात येतात आणि हल्ले करतात. हे संसदीय लोकशाहीचे मंदिर आहे.