Controversy of Manusmriti movement in Mahad : जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती (Manusmriti movement) असं लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. त्यानंतर भाषणाचे शेवटी आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना ताबडतोब अरेस्ट करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणावरून वाद वाढत असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ (Jitendra Awhad Apologized) शेअर करत माफी मागितली आहे.
काय म्हणाले Jitendra Awhad?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली आहे. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते.त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
गेली अनेक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे. डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे, असंही आव्हाड म्हणाले आहेत. मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही. मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील असा मला विश्वास आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले.
पाहा Video
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 29, 2024
हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले… pic.twitter.com/FjffRKPNOa
दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केल होता. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय. त्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे. महाड आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. तर आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप आव्हाडांविरोधात करण्यात आलाय.