Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

VIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क

Tiger Johnny Travels 300 KM: प्रेमात माणसं वेडी होताना आपण पाहतो, पण प्रेमाच्या शोधतात जॉनी वाघ 300 किमीचा टप्पा पार करत महाराष्ट्रातून तेलंगणा गाठलाय. 

VIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क

Tiger Johnny Travels Maharashtra To Telangana Video : सोशल मीडियावर सध्या एका वाघाची प्रेम कहाणी ट्रेंडिंगमध्ये आहे. महाराष्ट्र चंद्रपूरजवळील टिपेश्वर वाइल्डलाइन अभयारण्यातील जॉनी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. कारणही तसंच आहे, प्रेमात माणसं वेडी होताना पाहिलं आहेत आपण...पण तुम्ही कधी वाघाला प्रेमात पडताना ऐकलं आहे का? तर जॉनीची प्रेम कहाणी ऐकून तुम्ही नक्कीच अव्वाक व्हाल. जॉनी टिपेश्वर जंगलातून 300 किमीचा प्रवास करत तेलंगणाला पोहोचला आहे आणि तेही पाटर्नरच्या शोधतात. 

जॉनीचा प्रवास रेडिओ कॉलरद्वारे ट्रॅक करण्यात आला आहे आणि तो तेलंगणातील आदिलाबाद आणि निर्मल जिल्ह्यांमधून कृषी क्षेत्र आणि जंगलांमधून प्रवास करताना दिसून आलाय. वन्यजीव अधिकारी याला वाघांच्या नैसर्गिक वर्तनाचा भाग मानत आहेत, कारण हा वाघ आपल्या जोडीदाराच्या शोधात अनेक किलोमीटरचा प्रवास करतो, अशी माहती वन अधिकाराने दिलीय. 

किती वर्षांचा आहे जॉनी?

जॉनीने ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून प्रवास सुरू केला. वन अधिकाऱ्यांनी त्याला सगळ्यात पहिले आदिलाबादच्या बोथा मंडळाच्या जंगलात पाहिलं, त्यानंतर तो निर्मल जिल्ह्यातील कांतला, सारंगापूर, ममदा आणि पेंबी मंडळांमधून गेल्याचा आढळून आला. यानंतर जॉनीने हैदराबाद-नागपूर NH-44 हायवे ओलांडला आणि आता तो तेलंगणातील तिर्याणी भागाकडे जात असल्याचे समजतंय. जॉनीचं वय 6 ते 8 वर्षे वयोगटातील आहे, असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय. 

जोडीदार शोधा!

आदिलाबादचे जिल्हा वन अधिकारी प्रशांत बाजीराव पाटील यांनी पुष्टी केली की, जॉनीच्या या प्रवासामागे कारण वाघाची मादी वाघिणी जोडीदार शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाटील म्हणाले की, 'साहजिकच, वाघांना मादी वाघांच्या शोधात लांबचा प्रवास करावा लागतो, विशेषत: जेव्हा त्यांना त्यांच्याच प्रदेशात जोडीदार सापडत नाहीत.'

जॉनीचा प्रवास केवळ रोमान्ससाठी...

मादी वाघांना 100 किमी अंतरावरून त्यांच्या स्नायूंचा वास ओळखता येतो. मात्र, जॉनीचा हा प्रवास केवळ रोमान्ससाठी नाही. वृत्तानुसार, जॉनीने प्रवासादरम्यान पाच गुरे मारली आणि तीन वेळा गायींना मारण्याचा प्रयत्न केला. वन अधिकाऱ्याने सांगितलंय की, पाटर्नर शोधणाऱ्या वाघांचा थेट धोका नसतो, मात्र स्थानिक रहिवाशांना वन्य प्राण्याशी थेट संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अफवा टाळण्याचं आवाहनही करण्यात आलंय. 

वन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, जॉनीचा मार्ग त्याला कावल व्याघ्र प्रकल्पात घेऊन जाऊ शकतो, जिथे वाघांची स्थिर लोकसंख्या राखण्यात समस्या पहिलेपासून आहे. स्थलांतरित वाघ कावल व्याघ्र प्रकल्पाला नियमित भेट देत असले तरी 2022 पासून येथे कोणताही वाघ कायमस्वरूपी स्थायिक झालेला नाही. चीफ वाइल्डलाइफ वॉर्डन एलुसिंग मीरू म्हणाले की, जॉनी कावल व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य भागात स्थायिक झाल्यास, ते क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. 

Read More