Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन

 नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन आलंय. बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडेंनी हे इंजेक्शन चिमुकल्यांना देऊन प्रात्यक्षिकही दाखवलं. इंजेक्शननंतरही मुलींच्या चेह-यावर हसू पाहायला मिळतंय. 

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन

Nagpur : इंजेक्शनचं नाव काढलं तरी अनेकांना भीती वाटते. लहान मुलं तर हंबरडा फोडतात. पण आता घाबरायची गरज नाही कारण सुईशिवाय इंजेक्शन आलंय. नागपुरात डॉक्टरांनी या इंजेक्शनचं प्रात्यक्षिक दाखवलंय. त्यामुळे तिथल्या मुलांमधली इंजेक्शनची भीती नाहीशी झालीये. 

तब्येत बरी नसली की आपण डॉक्टरकडे जातो. यावेळी अनेकांच्या मनात भीती असते ती इंजेक्शनची. लहान मुलांना तर जास्तच धडकी भरते. तर इंजेक्शनची भीती वाटणा-या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन आलंय. बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडेंनी हे इंजेक्शन चिमुकल्यांना देऊन प्रात्यक्षिकही दाखवलं. इंजेक्शननंतरही मुलींच्या चेह-यावर हसू पाहायला मिळतंय. 

इंजेक्शन आवडे मुलांना : 

आयआयटी मुंबईकडून शॉकवेव्ह नावाची सिरींज विकसित करण्यात आलेली आहे. इंट्रामस्कुलर आणि सबक्युटिनस इंजेक्शनचा हा प्रकार असून सुई नसल्यानं इंजेक्शन घेतल्यानंतर सूज येत नाही. एका पिस्टलसारख्या मशीननं स्प्रिंगद्वारे उच्च दाबाचा वापर करून औषध शरीरात सोडतात. 
 औषध त्वचेद्वारे शरीरात सर्वत्र जातं, वेदनादायक नसून संसर्गाचा धोका कमी असतो. इंजेक्शनमुळे सुरक्षितेत वाढ, वेळेची बचत होईल. 

सध्या नागपुरात हे विनासुई इंजेक्शन उपलब्ध झालंय. येत्या काळात ते सर्वत्र मिळेल. यामुळे ज्यांना सुईच्या इंजेक्शनची भीती वाटते, त्यांची या त्रासातून मुक्तता होणार आहे. चिमुकल्यांनाही यामुळे दिलासा मिळालाय.  

Read More